Pune News : ब्रिक्स इंडिया कंपनीवर राज्य सरकार मेहेरबान : आ.रोहित पवार | पुढारी

Pune News : ब्रिक्स इंडिया कंपनीवर राज्य सरकार मेहेरबान : आ.रोहित पवार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ब्रिक्स इंडिया कंपनीचे दिलेले कंत्राट ग्रामविकास विभागाने रद्द केले होते. मात्र, आता त्याच कंपनीला सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात जेवण पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे या कंपनीवर सरकार मेहेरबान कसे झाले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटद्वारे केला आहे.

ही कंपनी हसन मुश्रीफ यांच्या जावयाची बेनामी कंपनी असून, कंपनीला कसलाही अनुभव नाही. तरीही आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना चालविण्यासाठी देण्यात आला. त्यात मनी लाँड्रिंग झाल्याचा गंभीर आरोप मविआ सरकारच्या काळात भाजपने केला होता. त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद आणि कोल्हापूर दौराही केला होता.

आता त्याच कंपनीला समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील आणि निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना भोजन पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले. त्यामुळे राजकीय सोयीसाठी खोटे आरोप करून लोकांची दिशाभूल केल्याबद्दल भाजप लोकांची माफी मागणार का?
असा सवालही रोहित यांनी विचारला आहे.

हेही वाचा

Back to top button