Crime News : साडेचार लाखांची दाम्पत्याची फसवणूक | पुढारी

Crime News : साडेचार लाखांची दाम्पत्याची फसवणूक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : जागा खरेदी करण्याच्या शोधात असलेल्या दाम्पत्याला कुसगाव येथील जमीन दाखवून आरोपीने 4 लाख 48 हजार रूपये घेत, विसार पावती केली. मात्र जागेची खरेदी न करता आरोपीने पिंपरीतील आपले कार्यालय बंद करून पळून जात, दाम्पत्याची फसवणूक केली. हि घटना 13 जुन ते 13 ऑगस्ट दरम्यान पिंपरी येथील मोरवाडी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिमन्यु ताराकांत चौधरी (वय 48, नौकरी, रा. रावेत) जागा खरेदी करण्याच्या शोधात होते. त्यावेळी फिर्यादीच्या पत्नीने मोबाईलवर कुसगाव खुर्द येथील बँगलो प्लॉटची जाहिरात पाहून आरोपी विशाल प्रकाश बागड (वय 40, कार्यालय रामा इक्वाटर, मोरवाडी, पिंपरी) यांच्याशी संपर्क साधला.

त्यानुसार आरोपीने जमीनीचे नकाशे, सातबारा व मुळमालकाशी झालेला व्यवहार दाखवत विश्वास संपादन केला. त्यानुसार सदर जागेच्या बदली 4 लाख 48 हजार रूपये फिर्यादीकडून घेतले. तसेच फिर्यादीच्या नावाची विसार पावती केली. मात्र जागेची खरेदी न करता आरोपीने पिंपरीतील आपले कार्यालय बंद करून पळून गेला. याविरोधात फिर्यादीने पिंपरी पोलिसांत फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला.

हेही वाचा

पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाला मुहूर्त मिळेना

अमित ठाकरे यांचे नाशिक दौरे वाढले, आज सप्तश्रृंगी चरणी

सावधान… इन्कम टॅक्सचं आपल्यावर लक्ष आहे..!

Back to top button