नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; तज्ज्ञ करणार अभ्यास | पुढारी

नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे धक्के; तज्ज्ञ करणार अभ्यास

राजेंद्र उट्टलवार

नागपूर: नागपूर जिल्ह्यात बुधवारी ( दि. ८) दुपारी ३. ५९ वाजून ५९ सेकंदानी पुन्हा भूकंपाचे धक्के बसले आहेत. नागपूर जिल्ह्यातील कामठी परिसर केंद्रबिंदू असून ५ किलोमीटर खोलीपर्यंत तीव्रता नोंदविली गेली आहे. भूकंपाची तीव्रता २. ४ रिश्टर स्केल अशी अतिशय कमी असली, कुठलीही हानी झालेली नाही.नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी आज यानिमित्ताने ‘पुढारी’ शी बोलताना केले.

नागपुरातील सौम्य भूकंपाचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास

आठवडाभरात चार वेळा भूकंपाचे धक्के बसल्याने आता नागपुरातील सौम्य भूकंपाचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास केला जाणार आहे, असे इटनकर यांनी सांगितले. यापूर्वी गेल्या आठवड्यात नागपूर जिल्ह्यात सौम्य धक्के बसले होते. यापूर्वी रिश्टर स्केलवर याची तीव्रता २.७ मॅग्नेट्यूड अशी झाली होती.

नागपूर जिल्ह्यातील या भूकंपाचा कुही केंद्र बिंदू असल्याची नोंद भूकंप मापन कार्यालयात झालेली आहे. शुक्रवारी २.५ मॅग्नेट्यूड तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपप्रवण क्षेत्राच्या बाबतीत अतिशय सुरक्षित मानल्या जात असलेल्या नागपूरला एकाच महिन्यात भूकंपाचे हे पाचव्यांदा धक्के बसले आहेत. शनिवारी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याची मॅग्नेट्यूड खोली २.४ क्षेत्रफळ पाच किलोमीटर तर लॅटिट्युड लोंगेस्ट २१. २ आणि ७९.३२ अशी नोंद झाली आहे.

यानंतर पुन्हा रविवारी त्याचवेळेस नागपूर परिसरात भूकंप झाल्याची नोंद असून २०. ८४ तर लॉंग ७९.१५ अशी नोंद झाली आहे. या परिसरात सतत खनिज उत्खनन सुरू असल्याने ब्लास्टिंगचा प्रकार असावा, अशी शक्यता वर्तविली गेली. प्रशासनाने चौकशी करून कारवाई केली पाहिजे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली. मात्र, तज्ज्ञांनी हे सौम्य भूकंप असल्याचे स्पष्ट केल्याने आता अभ्यासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा 

Back to top button