New Delhi : एअर इंडिया एक्सप्रेसच्या कर्मचारी संप प्रकरणी काँग्रेसचे नागरी उड्डान मंत्र्यांना पत्र | पुढारी

New Delhi : एअर इंडिया एक्सप्रेसच्या कर्मचारी संप प्रकरणी काँग्रेसचे नागरी उड्डान मंत्र्यांना पत्र

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : एअर इंडिया एक्सप्रेसच्या कर्मचारी संप प्रकरणी काँग्रेसने बुधवारी (दि. ८) नागरी उड्डान मंत्र्यांना पत्र लिहीले. एअर इंडिया एक्सप्रेसचे शेकडो कर्मचारी अचानक संपावर गेले. त्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसच्या ८० पेक्षा अधिक विमानांचे उड्डाण रद्द झाले. याप्रकरणी नागरी उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मध्यस्थी करण्याची मागणी, काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पत्राद्वारे केली.

एअर इंडिया एक्सप्रेसचे शेकडो कर्मचारी संपावर गेल्यामुळे, कंपनीला अनेक विमान उड्डाणे रद्द करावी लागली. यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याप्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांच्या मागण्या जाणुन घेवून संप सोडवावा. तसेच एअर इंडिया एक्सप्रेसची उड्डाणे लवकरात लवकर पूर्ववत करावीत, अशी मागणीही के. सी. वेणुगोपाल यांनी केली.

काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी लिहिले की, “एअर इंडिया एक्सप्रेस ही अनेक लोकांना सोईस्कर विमान कंपनी आहे. जगभरातील मध्यमवर्गीय कर्मचारी आणि प्रवासी याद्वारे प्रवास करतात. मात्र कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ८० पेक्षा अधिक उड्डाणे रद्द झाली आहेत. प्रवाशांना याचा मोठा त्रास झाला. लवकरात लवकर एअर इंडिया एक्सप्रेसची उड्डाणे पूर्ववत करण्यात यावी,” असेही त्यांनी लत्रात लिहिले आहे.

हेही वाचा :

Back to top button