Sasoon Hospital Drug Case : ससून चौकशी समिती म्हणजे फार्स : आ. रविंद्र धंगेकर | पुढारी

Sasoon Hospital Drug Case : ससून चौकशी समिती म्हणजे फार्स : आ. रविंद्र धंगेकर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीत आरोग्य विभागातीलच समकक्ष अधिकारी नेमल्याने या समितीवर कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी आक्षेप घेतला आहे. ही समिती म्हणजे केवळ फार्स असून निवृत्त न्यायधिशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरण व त्यानंतर घडलेल्या घडामोडींसंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाने एक चौकशी समिती नेमली आहे. या समितीमध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक, एक अधिष्ठाता व दोन प्राध्यापकांचा समावेश आहे. ससून रुग्णालयातून ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटीलने पलायन केल्यानंतर ससून रुग्णालयातील कारभार चव्हाट्यावर आला. सरकारने नेमलेली समिती हा केवळ फार्स असून यामधून काहीही साध्य होणार नाही.

ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या आशीर्वादाने ललित पाटील अनेक दिवस ससून रुग्णालयाचा पाहुणचार घेत होता. या ठिकाणाहून तो ड्रग्ज रॅकेट चालवत होता. त्यामुळे या प्रकरणात दोषी डॉक्टरांवरही चौकशी समिती कारवाई करू शकणार नाही. या डॉक्टरांना वाचवण्याचे काम समिती करू शकते. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करावी, अशी मागणी धंगेकर यांनी मुखमंत्र्यांकडे केली आहे.

हेही वाचा

घंटागाड्या दारोदारी, तरीही कचरा रस्त्यांवरी! पुण्यातील स्थिती

Pune News : पुण्यात तब्बल आठ इमारतींवर हातोडा

Pune Sex Racket : पुण्यात ऑनलाईन वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन मुलींची सुटका

Back to top button