Pune Sex Racket : पुण्यात ऑनलाईन वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन मुलींची सुटका | पुढारी

Pune Sex Racket : पुण्यात ऑनलाईन वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; दोन मुलींची सुटका

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जादा पैशांचे आमिष दाखवून तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याचा प्रकार वडगावशेरी भागात उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून येथून हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील दोन पीडित तरुणींची सुटका केली. तर, दोघा दलालांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राहकांशी ऑनलाईन संपर्क साधून हॉटेलवर हा वेश्याव्यवसाय सुरू होता.

दीपक शरयू यादव (वय 28, रा. चंदननगर, मूळ रा. झारखंड) व रवी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागातील अंमलदार तुषार भिवरकर यांनी फिर्याद दिली आहे. सिलॅन्ट्रो, नानाश्री ग्रँट, विमाननगर चौक, येरवडा याठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

संबंधित एजंट हा पैशाच्या आमिषाने पीडित तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागातील अंमलदार तुषार भिवरकर, अमेय रसाळ यांना मिळाली होती. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने संंबंधित ठिकाणी छापा टाकला. त्या वेळी येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी येथून उत्तर प्रदेश व हरियाणा राज्यातील दोन तरुणींची सुटका केली. त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, अंमलदार सागर केकाण, संदीप कोळगे, बाबा कर्पे, राजेंद्र कुमावत, रेश्मा कंक यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा

सांगली : शेगावच्या तरुणाची वैमानिक पदाला गवसणी; अभिनंदनाचा वर्षाव

नाशिकच्या अधोगतीला पालकमंत्री जबाबदार, राऊतांचा भुसे, भुजबळांवर निशाणा

रेल्वे नोटिसांबाबत मंत्री दानवेंशी चर्चा करू : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Back to top button