Pune Swimming Pool News : मोठी दुर्घटना : जलतरण तलावात क्लोरीन गॅस लीक, अनेकजण बेशुद्ध | पुढारी

Pune Swimming Pool News : मोठी दुर्घटना : जलतरण तलावात क्लोरीन गॅस लीक, अनेकजण बेशुद्ध

पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरातील कासारवाडी येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिके झाल्याची धक्कादायक घटना घडली. जलतरण तलावात आज सकाळी २२ नागरिक पोहण्यासाठी आले असता तलावात अचानक क्लोरीन गॅस लिक झाला, यामुळे 20 ते 22 जणांना श्वास घेण्याचा त्रास झाला आहे.

कासारवाडी येथे असलेल्या महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिके झाल्याने पोहण्यासाठी आलेल्या व्यक्तींना श्वास घेण्याचा त्रास झाला. काहीजण बेशुद्ध झाल्याची माहिती समोर येत आहे. पोहण्यासाठी २२ जण आले होते. यापैकी ११ जणांना त्रास झाल्याने यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आलं आहे. तसेच परिसरात क्लोरीन गॅस पसरल्यामुळे काही मीटरपर्यंत नागरिकांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. यामुळे कासारवाडी येथील जलतरण तलावाच्या जवळची वाहतूक बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल तसेच पोलीस दाखल झाले आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण?

पिंपरी चिंचवड येथील कासारवाडी परिसरातील महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात सकाळी पोहण्यासाठी आलेल्या तब्बल २२ नागरिकांना अचानक श्वास घेण्याचा त्रास सुरु झाला. यामुळे संबंधितांना यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आलं आहे. तलावाच नाही तर या परिसरात काही मीटर अंतरावर लोकांना हा त्रास सुरु झाला. तलावात क्लोरीन गॅस लिक झाल्याने दूरवर पसरला होता. यामुळे परिसरातील नागरिकांनाही याचा त्रास जाणवू लागला. या घटनेनंतर परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी पोलिसांनी बंद केले आहेत.

हेही वाचा

धुळे : इंदवे सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीप सोनवणेंची बिनविरोध निवड

Vijay Wadettiwar : कंत्राटी नोकर भरतीतील भ्रष्टाचार बाहेर काढणार; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा इशारा

Supriya Sule : मुंडे, महाजनांच्या मुलींचे भाजपकडून हाल : खासदार सुप्रिया सुळे

Back to top button