धुळे : इंदवे सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीप सोनवणेंची बिनविरोध निवड | पुढारी

धुळे : इंदवे सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीप सोनवणेंची बिनविरोध निवड

पिंपळनेर, पुढारी वृत्तसेवा ; तालुक्यातील इंदवे येथील नानासाहेब उत्तमराव पाटील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी दिलीप सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. संचालक मंडळाच्या बैठकीत चेअरमन सिताराम बोरसे आणि व्हा.चेअरमन सतीलाल भदाणे यांनी राजीनामा दिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विनायक काळे यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन आणि व्हा.चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली.

या निवडणुकीत दिलीप सोनवणे यांना सर्व संचालक मंडळ सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यांना एकमताने चेअरमनपदी निवडण्यात आले. तर व्हा.चेअरमनपदी भगवान जाधव यांची निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते पोपटराव सोनवणे, माजी चेअरमन सिताराम बोरसे, सतीलाल भदाणे, शंकर देवरे, दिलीप पाटील, संदीप वाघ, साहेबराव सोनवणे, भगवान अकलाडे, कौतिक पाटील, उत्तम इंदीस, जिजाबाई देवरे, संगीता पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष पंडित आकलाडे, माजी सरपंच जितेंद्र सोनवणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय सोनवणे, गोकुळ सोनवणे, महेंद्र सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य नानाभाऊ आकलाडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल सोनवणे, रवींद्र देवरे, प्रशांत सोनवणे, दिनेश सोनवणे, भैय्या सोनवणे, गोकुळ बोरसे, वाय.एन. सोनवणे, मच्छिद्र जाधव, संदीप सोनवणे, समाधान पवार, भास्कर बच्छाव, अविनाश देवरे, लोटन जाधव, नरेंद्र जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button