Archery WorldCup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखाची सुवर्ण हॅट्‌ट्रिक | पुढारी

Archery WorldCup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखाची सुवर्ण हॅट्‌ट्रिक

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमधील शांघाय येथे सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला तिरंदाज ज्योती सुरेखा वेनम हिने चमकदार कामगिरी केली आणि स्पर्धेतील चौथे सुवर्ण पदक जिंकले. ज्योतीने तिरंदाजी विश्वचषक स्टेज १ मध्ये महिलांच्या वैयक्तिकमध्ये कंपाऊंड प्रकारात सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत तिने वेगवेगळ्या प्रकारात तीन सुवर्णपदके जिंकून हॅट्‌ट्रिक केली आहे.

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने आतापर्यंत ४ सुवर्णपदके जिंकली आहेत. ज्योतीने महिलांच्या वैयक्तिकमध्ये कंपाऊंड प्रकारात मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेराला टायब्रेकरमध्ये पराभूत केले. अंतिम फेरीत स्कोअर १४६-१४६ असा बरोबरीत राहिला. त्यानंतर टायब्रेकरमध्ये बाजी मारत तिने भारताला चौथे सुवर्णपदक जिंकून दिले.

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी शनिवारी इतिहास रचला आहे. स्टेज १ मध्ये ज्योती सुरेखा वेन्नम, आदिती स्वामी आणि परनीत कौर यांच्या महिला कंपाउंड संघाने इटलीचा २३६-२२६ अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक जिंकले. तर अभिषेक वर्मा. प्रथमेश आणि प्रियांश यांच्या पुरुष कपाउंड संघाने नेदरलँड्सचा २३८-२३१ असा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांनी स्टेज १ मध्ये मिश्र कंपाउंड स्पर्धेत भारताला तिसरे सुवर्णपदक जिंकून दिले.

हेही वाचा : 

Back to top button