Pune crime : ठोंबरे टोळीतील दोघांवर आंदेकर टोळीकडून हल्ला | पुढारी

Pune crime : ठोंबरे टोळीतील दोघांवर आंदेकर टोळीकडून हल्ला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वर्चस्वाच्या वादातून आंदेकर टोळीतील हल्लेखोरांनी दोघांवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी सायंकाळी गणेश पेठ परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत निखिल आखाडे (वय 29), अनिकेत दूधभाते (वय 27, दोघे रा. आंबेगाव पठार, धनकवडी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पेठेतील आंदेकर टोळी आणि सूरज ठोंबरे टोळीत वैमनस्य आहे.

ठोंबरेचा साथीदार सोमनाथ गायकवाड याचे निखिल आखाडे, अनिकेत दूधभाते मित्र आहेत. सोमवारी सायंकाळी आखाडे आणि दूधभाते गणेश पेठेतील शितळादेवी मंदिर चौकातून अशोक चौकाकडे निघाले होते. त्या वेळी आंदेकर टोळीतील हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत आखाडे आणि दूधभाते गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या तीन हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा

Nashik Leopard News : नानेगावला पहाटे बिबट्या जेरबंद

Sai Paranjpye : सई परांजपे पुन्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत

Nasa News : ‘नासा’ 2040 पर्यंत चंद्रावर बनवणार मानवी वसाहत

Back to top button