पिंपरी : पवना धरण 76 टक्के भरले; पाणीसाठ्यात वाढ | पुढारी

पिंपरी : पवना धरण 76 टक्के भरले; पाणीसाठ्यात वाढ

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सध्या संततधार पाऊस सुरू असल्याने मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी (दि.27) धरण 76 टक्के भरले, तर पवना नदीचे पात्र दुथडी भरून वाहत होते. पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणार्‍या पवना धरण क्षेत्रात जुलै महिन्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. संततधार कायम असल्याने धरणात पाण्याचा साठा वेगाने वाढत आहे. धरण गेल्या गुरुवारी (दि.20) निम्मे भरले. पावसाचा जोर कायम असल्याने धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत आहे.
धरणात गुरुवारी पाणीसाठा 76 टक्क्यांपर्यंत पोहोचला.

धरणात पाणीसाठा सतत वाढत आहे. गेल्या 24 तासांत 32 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर, आत्तापर्यंत एकूण 1 हजार 591 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अद्याप धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात केलेली नाही. पावसाची संततधार कायम राहिल्यास येत्या आठवडाभरात धरण 100 टक्के भरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान,गेल्या वर्षी याच दिवशी पवना धरणात एकूण 80.46 टक्के इतका पाणीसाठा होता. तर, एकूण 2 हजार 809 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणात यंदा केवळ 4 टक्क्याने कमी पाणीसाठा आहे.

हेही वाचा

चार वर्षांत ‘हिपॅटायटीस बी’चे दोन हजारांहून अधिक रुग्ण

पिंपरी : इलेक्ट्रिक वाहनांना आले चांगले दिवस; महापालिकेकडून प्रोत्साहन

पुणे महापालिकेकडून निधीची उधळपट्टी ! येरवड्यात पथदिव्यांचे सुस्थितीतील ब्रॅकेट बदलले

Back to top button