पुणे: नानोली- इंदोरी रस्त्याची झाली दुरावस्था | पुढारी

पुणे: नानोली- इंदोरी रस्त्याची झाली दुरावस्था

जगन्नाथ काळे

तळेगाव स्टेशन (पुणे): मावळ तालुक्यातील इंदोरी ते नानोली रस्त्याची दुरावस्था झाली असुन रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे. तसेच चिखलामुळे रोडराडा झाल्याने रस्त्यावर वाहन घसरण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. हा रस्ता धोकादायक झालेला आहे. तसेच सध्या पावसाळा असल्यामुळे वाहन चालकांचे अतिशय हाल होत आहेत.

या रस्त्यावरुन तळेगाव आणि चाकण एमआयडीसी कामगार वर्ग, विद्यार्थ्यांसह अनेक नागरिकांना नउलाख उंबरे आणि चाकण परिसरात कामानिमित्त ये-जा करावी लागते . तरी या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी, यासाठी ग्रामस्थांनी संबंधितांना निवेदन दिलेले आहे. रस्ता दुरुस्तीसाठी निधीही मंजूर झालेला आहे . या रस्त्याचे दुरुस्तीचे काम पावसाळ्यापुर्वी होणे आवश्यक होते, परंतु झालेले नाही. तरी प्रशासनाने याबाबत दखल घ्यावी, अशी परीसरातील नागरिकांची मागणी आहे.

नानोली-इंदोरी रस्ता दुरुस्तीसाठी ७० लाखाचा निधी मंजुर झालेला असला तरीही रस्ता दुरुस्तीचे काम रेंगाळले आहे. प्रशासनाने दखल घेऊन रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने करावे
मनिषा मखमाले, ग्रामपंचायत सदस्य

हेही वाचा: 

Back to top button