Turkey | उंच टेकडीवर होते रोमँटिक मूडमध्ये, पण प्रेयसीचा १०० फूट दरीत कोसळून मृत्यू | पुढारी

Turkey | उंच टेकडीवर होते रोमँटिक मूडमध्ये, पण प्रेयसीचा १०० फूट दरीत कोसळून मृत्यू

पुढारी ऑनलाईन : प्रियकराने प्रपोज केल्यानंतर काही क्षणातच १०० फूट उंच कड्यावरून पडून प्रेयसीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तुर्कीमध्ये (Turkey) घडली आहे. नवीन जोडप्याला त्यांची एंगेजमेंट खास पद्धतीने साजरी करायची होती. पण असे करणे जीवघेणे ठरले.

तुर्कीमधील एक नवीन जोडपे मावळत्या सूर्याच्या साक्षीने त्यांच्या एंगेजमेंटचा क्षण साजरा करणार होते. त्यासाठी ते उंच कड्यावर गेले होते. पण प्रियकराची ३९ वर्षीय प्रेयसी येसीम डेमीर १०० फूट उंच कड्यावरून खाली दरीत कोसळली. ६ जुलै रोजी वायव्य तुर्कीमधील कनाक्कले या शहरात ही घटना घडली, असे वृत्त द न्यूयॉर्क पोस्टने दिले आहे.

येसिम आणि तिचा प्रियकर निझामेटिन गुरसू यांना त्यांची एंगेजमेंट खास पद्धतीने साजरी करायची होती. त्यासाठी ते उंच कड्यावर गेले. येसिमचा प्रियकर जेव्हा खाद्यपदार्थ आणि ड्रिंक्स आणण्यासाठी कारकडे आला तेव्हा त्याला किंचाळल्याचा आवाज आला. त्यानंतर तो मागे फिरला असता त्याला येसिम उंच कड्यावर दरीत कोसळल्याचे दिसले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, येसिम उंच कड्यावरुन खाली १०० फूट पडली. तिला रुग्णालयात नेण्यात आले. पण, गंभीर दुखापतीमुळे तिचा मृत्यू झाला. गुरसूने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ही जागा रोमँटिक क्षण साजरा करण्यासाठी योग्य असेल, म्हणून आम्ही तेथे गेलो होते. त्याने सांगितले की दोघांनी थोडे मद्यप्राशन केले होते. यामुळे तिचा तिचा तोल गेला आणि ती पडली असावी.

गुरसूने तिच्या प्रेयसीच्या मदतीसाठी हाक दिली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तिला रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (Turkey)

हे ही वाचा :

Back to top button