पुणे : गॅस कंटेनरचा भीषण स्‍फोट; अनेक घरांचे नुकसान

File Photo
File Photo

चाकण : पुढारी वृत्तसेवा आज (रविवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास चाकण शिक्रापूर महामार्गावर शेलपिंपळगाव (ता. खेड, जि. पुणे) गावाच्या हद्दीत मोहितेवाडी फाट्यावर हॉटेल राजस्थानी समोर उभ्या असलेल्या अतिज्वलनशील गॅस वाहतूक करणाऱ्या कंटेनरला अचानक भीषण आग लागली. यामध्ये कंटेनरमधील ज्‍वलनशील पदार्थामुळे प्रचंड स्फोट झाला. यामध्ये लगतच्या ३ ते ४ कंटेनरचे आणि परिसरातील घरांच्या भिंती कोसळून खूप मोठे नुकसान झाले आहे.

कंटेनर मधून गॅस वाहतूक करणाऱ्या या टँकरचा स्फोट एवढा जबरदस्त होता की, मोहितेवाडी येथील या स्फोटाच्या घटनेनंतर लगतच्या बहुळ, साबळेवाडी, शेलपिंपळगाव ते अगदी रासे, भोसे, कडाचीवाडी पर्यंत स्फोटाचे आवाज आल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या घटनेत कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. गॅस वाहतूक करणाऱ्या कंटेनरच्या स्फोटाने परिसरातील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या २ अग्निबंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news