ChatGPT Android App : चॅटजीपीटीचं अँड्रॉईड अ‍ॅप भारतात लॉंच; जाणून घ्या कसं करता येईल डाऊनलोड | पुढारी

ChatGPT Android App : चॅटजीपीटीचं अँड्रॉईड अ‍ॅप भारतात लॉंच; जाणून घ्या कसं करता येईल डाऊनलोड

पुढारी ऑनलाईन: चॅटजीपीटीचा एआय चॅटबॉट हा आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. केवळ कॉम्प्युटर आणि आयफोनवर उपलब्ध असणारं हे एआय टूल आता अँड्रॉईड मोबाईलवरही उपलब्ध होणार आहे. चॅटजीपीटी हे मोबाइल अ‍ॅप सध्या भारत, अमेरिका, बांगलादेश आणि ब्राझीलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर चॅटजीपीटी मोबाइल अ‍ॅप अखेर अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध झाले आहे. आयओएस व्हर्जनवर लॉंच झाल्यानंतर हे अ‍ॅप दोन महिन्यांनी अँड्रॉइड व्ह्जर्नवर लॉन्च केले गेले आहे. मागील वर्षी ओपनएआय कंपनीने आपला चॅटजीपीटी चॅटबॉट लॉंच केला. यानंतर गुगल आणि मायक्रोसॉफ्टने देखील आपले चॅटबॉट लॉन्च केले आहेत.

सॅम ऑल्टमन यांच्या कंपनीने चॅटजीपीटी मोबाइल अ‍ॅप हे अँड्रॉइड व्हर्जनवर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लॉंच केले जाईल, अशी घोषणा केली होती. विशेष म्हणजे अँड्रॉइड अ‍ॅप अशा वेळी लॉंच केले आहे, जेव्हा चॅटजीपीटीच्या ट्रॅफिकमध्ये घसरण होत आहे. परंतु, आता हे अ‍ॅप लॉंच झाले असून तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून ते डाऊनलोड करून रजिस्ट्रेशन करू शकता.

येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये अँड्रॉइड अ‍ॅप उपलब्धतेचा विस्तार करण्याची ओपनएआयची योजना आहे. सुरुवातीला हे अ‍ॅप केवळ आयओएस युजर्ससाठीच उपलब्ध करून देण्यात आले होते. आता अँड्रॉइडवर देखील हे अ‍ॅप लॉंच झाल्यामुळे अनेक अँड्रॉइड युजर्स आता चॅटजीपीटी वापरू शकणार आहेत. हे सर्वांसाठी अ‍ॅप विनामूल्य उपलब्ध असणार आहे. चॅटजीपीटीचे मोबाइल अ‍ॅप हे सध्या भारत,अमेरिका, बांगलादेश आणि ब्राझीलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे अ‍ॅप एकाच वेळी जगभरात उपलब्ध करून देण्याऐवजी टप्प्याटप्प्याने ते रोलआउट करण्यात येणार आहे.

अँड्रॉईड मोबाईलमध्ये चॅटजीपीटी अ‍ॅप कसे डाउनलोड करावे?

  1. चॅटजीपीटीचे अधिकृत अ‍ॅप कंपनीने दिलेल्या अधिकृत लिंकवरून डाऊनलोड केले जाऊ शकते. याशिवाय चॅटजीपीटी प्ले स्टोअरवरूनही डाऊनलोड करता येईल.
  2. सर्वप्रथम अँड्रॉईड फोनवरून प्ले स्टोअरमध्ये जावे लागेल.
  3. प्लेस्टोअरवर चॅटजीपीटी अ‍ॅप असे टाइप करावे लागेल.
  4. चॅटजीपीटी टाइप करण्यासोबतच अ‍ॅपवर मोबाईल नंबर टाइप करावा लागेल
  5. कंपनीचे अधिकृत अ‍ॅपबावर तुम्हाला निळ्या बॅकग्राउंडमध्ये दिसेल. ओपनएआय चॅटजीपीटी अ‍ॅपच्या खाली दिसेल.
  6. अ‍ॅपवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन्स्टॉल या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  7. ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर अ‍ॅप डाउनलोड केले जाईल आणि तुमच्या अँड्रॉईड फोनवर वापरासाठी उपलब्ध होईल.

रिंगरोडसाठी भूसंपादन करताना अन्याय ; शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यासमोर धरणे आंदोलन

डिजिटल युगात 39 टक्के ग्राहक रांगेत थांबून भरताहेत वीजबिल

Kolhapur Rain | राधानगरी धरणाचे ४ स्वयंचलित दरवाजे उघडले

 

Back to top button