रिअल इस्टेट वाढीत पुणे नंबर वन! खराडी, बाणेर, हिंजवडीसह शहरांत हजारो नवे प्रकल्प | पुढारी

रिअल इस्टेट वाढीत पुणे नंबर वन! खराडी, बाणेर, हिंजवडीसह शहरांत हजारो नवे प्रकल्प

दिगंबर दराडे

पुणे : पुणे शहराची ऐतिहासिक ओळख आहे. त्यानंतर पुणे हे शिक्षण, आयटी हब म्हणून ओळखले जाऊ लागले. आता याच शिरपेचात आणखी एक मानाचा तुवरा रोवला जात आहे. गेल्या काही वर्षांत रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीवर असलेले शहर म्हणून शहराची ओळख निर्माण होत आहे. देशात सर्वाधिक वेगाने वाढणारे शहर म्हणूनही पुण्याने नावलौकिक मिळविला आहे.

देशातील एका एजन्सीकडून हा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यामध्ये ही आकडेवारी समोर आली आहे. प्रामुख्याने 2021 च्या दुसर्‍या तिमाहीत तीन हजार 569 घरे विकली गेली आहेत. त्या तुलनेत यंदाच्या दुसर्‍या तिमाहीत साडेआठ हजारांपेक्षा अधिक घरे विकली गेली असल्याचे समोर आले आहे. बांधकाम साहित्याच्या वाढत्या किमती, कर्जाचे वाढते व्याजदर जरी असले, तरी पुण्यात घरखरेदीला देशातील नागरिकांनी पसंती दिली आहे. पुण्यात मागील वर्षाच्या (2021) पहिल्या सहामाहीच्या (जानेवारी ते जून) तुलनेत या वर्षाच्या (2022) पहिल्या सहामाहीत निवासी घरांच्या विक्रीत 133 टक्के वाढ झाली आहे.

प्रामुख्याने घरांची विक्री तर वाढली आहेच. मात्र, त्याचबरोबर प्रकल्पांची संख्यादेखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात पुणे शहर चारही बाजूंनी वाढत असल्याचे समोर आले आहे. चारही बाजूंचे मालमत्तेचे दर हे वाढलेले असतानादेखील नागरिकांची पुण्यात घर खरेदी करण्याला मोठी पसंती मिळत आहे.

देशातील शहरे वाढीची टक्केवारी

पुणे ः 65
मुंबई ः 48
चेन्नई ः 44
दिल्ली ः 07

दृष्टिक्षेपात एक हजारपेक्षा अधिक प्रकल्प
आयटीच्या मंडळींची
पुण्याला पसंती
आल्हाददायक
वातावरणाची
सर्वांनाच भुरळ

पुणे शहरात ठरावीक बांधकाम व्यावसायिकांकडून प्रकल्प करण्यात येत होते. अनेक वेळा बिल्डरांकडून ग्राहकांची फसवणूक होत होती. मात्र, आता पुणे शहर आणि परिसरात बड्या बिल्डरांनी मोठी गुंतवणूक केली आहे. प्रामुख्याने शासनाने कायदे कडक केल्यामुळे नागरिकदेखील बिनधास्तपणे गुंतवणूक करीत आहेत. रेरामुळे नागरिकांना फायदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई, दिल्लीसह मोठ्या बांधकाम व्यावसायिकांनी प्रकल्प सुरू केले आहेत. विविध सुविधांनीयुक्त प्रकल्प होत असल्याने नागरिकांचा ओढादेखील निसर्गरम्य ठिकाणांकडे वाढत आहे. पूर्वीच घनदाट झाडी असलेल्या भागात टुमदार बिल्डिंग उभ्या राहत आहेत.

हेही वाचा

पुढील 4 दिवस धोक्याचे ! कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

सोलापूर : भाजपचे चार माजी नगरसेवक बीआरएसच्या वाटेवर

सांगली : जनावरांना कत्तलखान्याकडे घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी रोखला

Back to top button