सांगली : जनावरांना कत्तलखान्याकडे घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी रोखला | पुढारी

सांगली : जनावरांना कत्तलखान्याकडे घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी रोखला

जत; पुढारी वृत्तसेवा : जनावरांचा छळ करत कत्तलखान्याकडे जाणारा टेम्पो उमदी पोलिसांनी रोखला आहे. त्यातील २९ जनावरांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी उमदी पोलिसांनी चौघावर प्राण्यांचा छळ प्रतिबंध १९९० या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

जनावरांची बेकायदेशीर व विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी विलास संपत्ती जावीर (वय 32), पप्पू हनमंत जावीर (वय २३) दोघीही (रा.लोणार, ता. मंगळवेढा जि.सोलापूर) वाहन चालक समीर सयपणसाब शेख (वय २२, रा. खतिजापूर ता. नागठाण जि. विजापूर) व अन्य आकाराम नामक व्यापारी असे चौघा संशियतावर उमदी पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, जत तालुक्यातून कत्तलखान्याकडे लहान मोठे असे २९ जनावरे घेऊन जाणारे दोन पिकअप सोन्याळ ते अंकलगी रस्त्यावर निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता (MH 11 BL 7228) या पिकअप मध्ये ४ म्हशी व २५ जर्सी गाईंची वासरे,असे एकूण २९ जनावरे होती. जनावरांना या जनावरांना संशयित आरोपींनी विनापरवाना व बेकायदेशीर रित्या अपुऱ्या जागेत दाटीवाटीने ठेवण्यात आली होती. त्यांना अन्न व चारा देखील दिलेला नव्हता. जनावरांना क्रूरपणे वागणूक दिल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. सदरच्या ही जनावरे वाहनातून कत्तलखान्याकडे नेण्यात येणार असल्याचे आरोपीने सांगितले आहे असे पोलिसात स्पष्ट झाले आहे. वाहनासह ८ लाख ६२ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी उमदी पोलिसात महेश रुद्रप्पा स्वामी यांनी तक्रार दिली आहे. या घटनेचा अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.

Back to top button