पुण्यातील ‘हे’ पंधरा रस्ते घेणार मोकळा श्वास | पुढारी

पुण्यातील 'हे' पंधरा रस्ते घेणार मोकळा श्वास

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने शहरातील प्रमुख 15 रस्ते आदर्श रस्ते करण्यासाठी पावले टाकली आहेत. या रस्त्यांवर किमान तीन वर्षे खोदाई, अतिक्रमण होणार नाही, दुभाजक आणि रोड फर्निचर आकर्षक आणि स्वच्छ ठेवण्यात येणार आहेत. यापैकी 9 रस्त्यांच्या कामांसाठी निविदा मागविण्यात आल्या असून, कामासाठी सुमारे 40 कोटी रुपये खर्च येणार आहे. लवकरच निविदांना मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी दिली.

हे रस्ते अनधिकृत फलक, पोस्टर्स आणि ओव्हर हेड केबल मुक्त ठेवण्यात येणार आहेत. या रस्त्यावर ज्याठिकाणी छोट्या स्वरूपात पाणी, ड्रेनेज व सेवा वाहिन्यांची कामे करून घेणे, या रस्त्यांवरील व दुभाजकांवरील राडारोडा, कचरा उचलणे, आवश्यक तेथे पेटिंग करून घेणे, दुभाजकांवर फ्लॉवर बेड्स निर्माण करणे, रस्त्याच्या कडेला पदपथ तसेच व्यावसायिक इमारतींच्या फ—ंट मार्जिनमधील अतिक्रमण काढून टाकणे, बेकायदा फ्लेक्स, फलक आणि ओव्हरहेड केबल्स काढून टाकणे, ही कामे करण्यात येणार आहेत.

जी- 20 परिषदेच्या निमित्ताने शहरातील प्रमुख रस्त्यांवर रंगरंगोटी, दुरुस्ती आणि सुशोभीकरणाची कामे झाली आहेत. पहिल्या टप्प्यात यापैकी 15 प्रमुख रस्ते कायमस्वरूपीच सर्वतोपरी आदर्श व्हावेत, यासाठी ममिशन 15फ अंतर्गत नियोजन करण्यात आले आहे. यापैकी 15 रस्त्यांसाठी निविदादेखील मागविण्यात आल्याचे ढाकणे यांनी सांगितले.

वाहतूक पोलिसांसोबतच चर्चा करून या रस्त्यांवरील सिग्नल सिंक्रोनायजेशन करून वाहतूक सुरळीत राहील यासाठीदेखील विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. वाहतूक चिन्हे बसविणे, दुरुस्त करणे, दिशादर्शक फलक बसविणे व दुरुस्त करणे ही कामे पुढील तीन वर्षे संबंधित ठेकेदाराला करावी लागणार आहेत. सेवा वाहिन्यांसाठी प्रामुख्याने केबलसाठी रस्ते खोदाई करायला लागू नये यासाठी प्रमुख रस्त्यांवर काही अंतराने आडवे पाईपही टाकण्यात येणार असल्याचे ढाकणे यांनी नमूद केले.

आदर्श रस्त्यांचा मान या रस्त्यांना

नगर रस्ता, सोलापूर रस्ता, मगरपट्टा रस्ता, पाषाण रस्ता, औंध रस्ता, बाणेर रस्ता, संगमवाडी रस्ता, विमानतळ व्हीआयपी रस्ता, कर्वे रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी रस्ता, कोरेगाव पार्क नॉर्थ मेन रस्ता, गणेशखिंड रस्ता ते सेनापती बापट रस्ता, शिवाजी रस्ता.

हेही वाचा

समृद्धी महामार्ग ठरतोय किलर मार्ग; ५ महिन्यांत ९५ मृत्यू, ३३ टक्के अपघात महामार्ग संमोहनमुळे

Parineeti-Raghav : राघव-परिणीतीची सुवर्ण मंदिराला भेट, नेटकरी म्हणाले, इतकी सिक्युरिटी कोण घेऊन येतं (Video)

नगरमधील कोपरगावात वाळू तस्करांविरूद्ध धडक मोहीम

Back to top button