नगरमधील कोपरगावात वाळू तस्करांविरूद्ध धडक मोहीम | पुढारी

नगरमधील कोपरगावात वाळू तस्करांविरूद्ध धडक मोहीम

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यात विनापरवाना बेकायदा शासकीय वाळू  त्यांच्या आर्थिक फायद्याकरिता चोरून वाहतूक करताना मिळून आल्याप्रकरणी तहसील प्रशासनाने 13 जणांवर शहाजापूर कोळपेवाडी, कोळगाव थडी, माहेगाव कुंभारी परिसरातील वाळू चोरट्यांवर दि. 29 रोजी रात्री माहेगाव देशमुख शिवारात गोदावरी नदीपात्रात ही धडक कारवाई करण्यात आली. महसुलच्या पथकाने 42 लाख 20 हजार रुपये किमतीची वाळू व 7 वाहने जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती ग्रामिण पोलिस निरिक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे. वाळू तस्करांनी वाळू चोरीचा धडाका लावला असून गोदावरी नदीची अक्षरश: चाळणी केली आहे. बेसुमार व प्रमाणापेक्षा जास्त वाळू उपशान पर्यावरणाचा र्‍हास होत आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत बाळासाहेब बर्डे (वय 20 रा.शहाजापूर ता.कोपरगाव), दत्तू कोळपे (पूर्ण नांव माहित नाही, रा.कोळपेवाडी), दिलीप विलास पवार (वय 25 रा.कोळगाव थडी ता.कोपरगाव), देवराम वाल्मिक कोळपे (रा. कोळपेवाडी) , किरण साहेबराव निकाळे (रा.कोळगाव थडी), रामा कुंदलखे (पूर्ण नाव माहित नाही), कृष्णा दिपक मोरे, आकाश मदने, अनील नाथू कचारे, मिलिंद खर्डे (पूर्ण नाव माहित नाही) अक्षय किशोर मोरे, गणेश डांगे, योगेश संजय कोळपे, या तेरा आरोपींविरुद्ध कारवाई केेली.

आरोपींकडून 6 लाख 10 हजार रुपये किंमतीचा बाळासाहेब बर्डे यांच्या ताब्यातील स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर विना क्रमांकाचा, दोन चाकी ट्रॉली 10 हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाळू, 6 लाख 10 हजार रुपये किंमतीचा दिलीप विलास पवार याचे ताब्यातील स्वराज कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर, हिरव्या रंगाची दोन चाकी ट्रॉली व 10 हजार रुपये किंमतीची वाळू, किरण बाळासाहेब निकाळे याचे ताब्यातील लाल रंगाचा राज कंपनीचा ट्रॅक्टर, एक लाल रंगाची दोन चाकी टॉली, कृष्णा दिपक मोरे याचे ताब्यातील लाल रंगाचा स्वराज विना क्रमांकचा ट्रॅक्ट,र दोन चाकी ट्रॉली, अनिल नातू कचारे याचे ताब्यातील निळया रंगाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर दोन चाकी ट्रॉली अर्धवट वाळूने भरलेला, अक्षय किशोर मोरे याचे ताब्यातील लाल रंगाचा स्वराज ट्रॅक्टर, दोन चाकी ट्रॉली, योगेश संजय कोळपे निळया रंगाचा स्वराज ट्रॅक्टर व वाळू असा एकूण 42 लाख 20 हजार रुपये किंमतीचा वाळू व वाहने ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणी सहा.फौजदार गवसणे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिस निरिक्षक वासुदेव देसले पुढील तपास करीत आहे. पुढील तपास सहा.फौजदार वांढेकर करीत आहे. या कारवाईमुळे वाळु तस्करांचे धाबे दणाणले आहे. पोलीसांच्या कारवाईनंतर नदी पात्रातील अवैध वाळू वाहणार्‍यांनी या ठिकाणाहून धुम ठोकली.

वाळू डेपो केंद्र सुरू होणार
तालुक्यातील कुंभारी व सुरेगाव येथे पुढील आठवड्यात शासनाच्या वतीने वाळू साठवणूक तसेच विक्री डेपो केंद्र पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी दिली. या पार्श्वभ्ाुमीवर ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली असल्याची माहिती भोसले यांनी दिली.

हे ही वाचा : 

पुणे-पानशेत रस्त्यांची पावसामुळे लागली वाट !

नगर : मंडपातून नवरी प्रियकरासमवेत पळाली

Back to top button