प्रेमीयुगलाचा दुचाकीवर जीवघेणा रोमान्स; पोलिसांनी घडवली अद्दल | पुढारी

प्रेमीयुगलाचा दुचाकीवर जीवघेणा रोमान्स; पोलिसांनी घडवली अद्दल

पुढारी, ऑनलाईन डेस्क : प्रेम लोकांना वेड लावू शकते आणि त्या प्रेमाच्या वेडामध्ये प्रेमीयुगल कोणत्या थरापर्यंत जातील याचा काही नेम नाही. राजस्थानमधील कोटा शहराच्या रस्त्यावर असाच एक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एक प्रेमीयुगल चक्क दुचाकीवर जीव धोक्यात घालून रोमान्स करताना दिसत आहेत.

कोटा शहरातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी मोटरसायकलवरून अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ मोटारसायकलच्या मागे जात असलेल्या दुसऱ्या एका ड्रायव्हरने हा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. या जोडप्याचा व्हिडिओ X वर व्हायरल झाल्यानतंर ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आली. दुचाकीच्या नंबर प्लेटच्या आधारे शहर पोलिसांनी कारवाई करून मोहम्मद वसीम (रा. कैथून), मुलगी, रिजवाना, रा. (दिल्ली,कृष्णा नगर) यांना अटक केली.

पाहा नक्की काय घडले

या कायद्यान्वये गुन्हा दाखल

पोलीस अधिकारी नवल किशोर शर्मा यांनी सांगितले की, आरोपी मुलगा आणि मुलीवर सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबत मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ सुमारे एक मिनिट १४ सेकंदांचा आहे. यामध्ये हा तरुण भरधाव वेगाने दुचाकी चालवताना दिसला. मुलगी त्याच्या मागे बसली असताना दोघेही सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करताना दिसले.

युवक आणि युवतीला अटक

दोघांनी मागितली माफी

या घटनेच्या कारवाई करत आरोपी तरुण व युवती दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुचाकीच्या नंबर प्लेटच्या आधारे दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी मुला-मुलीची माफी मागितली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही भविष्यात असे कृत्य न करण्याबाबत बोलत आहेत.

हेही वाचा :

Back to top button