महाराष्ट्र, केरळ किनारपट्टीवर बाष्पयुक्त ढगांचे डोंगर, हे जिल्हे ‘रेड अलर्ट’मध्ये | पुढारी

महाराष्ट्र, केरळ किनारपट्टीवर बाष्पयुक्त ढगांचे डोंगर, हे जिल्हे 'रेड अलर्ट'मध्ये

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-केरळ किनारपट्टीवर बाष्पयुक्त ढगांचे डोंगर (ऑफ शोअर ट्रफ) तयार झाल्याने आगामी पाच दिवस कोकण व गोवा भागाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक घाटाला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात आगामी 48 तास संततधार राहील. दरम्यान, बुधवारी मान्सूनने राजस्थानसह 99 टक्के देश व्यापला.
गेल्या पाच दिवसांपासून राज्यासह संपूर्ण देशात मान्सूनचा प्रवास प्रचंड वेगाने सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र चांगला पाऊस
पडत आहे. अंदमान, निकोबार, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, हिमालय, ओडिशा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात, कच्छ, सौराष्ट्र, कोकण, गोवा तसेच राज्यातील घाट परिसरात अतिवृष्टी होत आहे.

कोकण, गोव्यात मोठ्या पावसाची शक्यता
हवामान विभागाने राज्यातील घाट भागांना सावधानतेचा इशारा दिला आहे. यात कोल्हापूर, सातारा, पुणे व नाशिक येथील घाटांचा समावेश आहे. या भागात पर्यटकांनी फिरायला शक्यतो जाऊ नये. गेलात तर अतिशय काळजीपूर्वक वाहने चालवा, पावसात काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे.

असे आहेत अलर्ट…
– कोकण, गोवा (रेड अलर्ट) ः दि. 29 जून ते 3 जुलै.
– कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक घाट : (रेड अलर्ट) ः 48 तास.
– मध्य महाराष्ट्र : 29 व 30 जून : (मुसळधार).
– मराठवाडा ः 29 व 30 जून : (मध्यम पाऊस)
– विदर्भ : 29 व 30 जून : (मध्यम पाऊस).

राज्यातील पाऊस (मि.मी.)
कोकण विभाग : पालघर 134, मडगाव 119, काणकोण 118, देवगड 114, मालवण 101, जव्हार 97, पेण 95, माणगाव 94, फोंडा 90, भिवंडी, सावंतवाडी 77, शहापूर 75, लांजा 68, ठाणे 60.

मध्य महाराष्ट्र : ओझरखेडा 100, गगनबावडा 90, महबळेश्वर 76, धुळे 65, इगतपुरी 61, वेल्हे 48, त्र्यंबकेश्वर 44.

मराठवाडा : गंगापूर 58, खुलताबाद 34, छत्रपती संभाजीनगर 34, पूर्णा 32, चाकूर 31, मानवत 29.

विदर्भ : कोरची 158, कुरखेडा 140, देवरी 98, देसाईगंज 82, भंडारा 62, आरमोरी 53, गोंदिया 52, ब्रह्मपुरी 38.

घाटमाथा : शिरगाव 70,अम्बोणे 87, भिवपुरी 90, दावडी 98, कोयना 79, खोपोली 48, ताम्हिणी 147, डुंगरवाडी 140, भिरा 103.
तलाव : वैतरणा 111, तानसा 93, तुळशी 35, भातसा 75, वैतरणा (मध्य) 64.

हे ही वाचा :

Ashadhi Ekadashi Mahapuja : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न

Titan submarine : समुद्रातून काढण्यात आले टायटन पाणबुडीचे अवशेष

Back to top button