Ashadhi Ekadashi Mahapuja : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न

पंढरपूर: पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक मोठ्या उत्साहात व चैतन्यमय वातावरणात संपन्न झाली. याप्रसंगी त्यांचे सुपुत्र खा. श्रीकांत शिंदे सपत्नीक उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर पूजा करण्याचा मान वाकडी (ता. नेवासा) येथील भाउसाहेब मोहनीराज काळे (वय 56) आणि मंगल भाऊसाहेब काळे (वय 52) या शेतकरी कुटुंबातील वारकरी दांम्पत्याला मिळाला. हे मानाचे वारकरी गेल्या 25 वर्षापासून भास्कर गिरी महाराज यांच्या सोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करीत आहेत.