तब्बल 160 धरणग्रस्तांना लवकरच जमिनी | पुढारी

तब्बल 160 धरणग्रस्तांना लवकरच जमिनी

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा :  खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणग्रस्त शेतकर्‍यांनी मुंबईच्या आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत सरकारने धरणग्रस्त शेतकर्‍यांना पर्यायी जमीन वाटप करण्याची प्रक्रिया शासनस्तरावर सुरू केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आनंद व्यक्त केला. पात्रता तपासून 65 टक्के रक्कम भरण्यासाठी आता चलन मिळणार आहे.
खेडच्या भामा आसखेड धरणग्रस्त शेतकर्‍यांनी धरणे आंदोलन केल्याने या आंदोलनाची दखल पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव आसिम गुप्ता यांनी घेत सकारात्मक भूमिका घेतली.

त्यांच्या भूमिकेला पुणे जिल्हा पुनर्वसन अधिकारी संदेश शिर्के यांनी सहकार्य केले. शिर्के यांनी एकाच दिवसामध्ये 160 धरणग्रस्त शेतकर्‍यांना एकाचवेळी 16/2 ची नोटीस देऊन इतिहास घडवीत वेगवान पद्धतीने अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित काम केले. आता लवकरच शेतकर्‍यांना 65 टक्के रक्कम भरून घेण्याचे चलन मिळणार आहे. पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांची धरणग्रस्त शेतकर्‍यांसोबत झालेल्या बैठकीत 388 धरणग्रस्त शेतकर्‍यांना जमीन वाटपासंदर्भात ज्या काही त्रुटी आहेत, त्या सर्व त्रुटींची पूर्तता करून द्यायला सांगितली आहे. त्रुटींची पूर्तता केली की, शासन नियमाप्रमाणे प्राधान्य क्रमानुसार शेतकर्‍यांना जमीन वाटप होणार आहे. 388 पैकी 68 शेतकर्‍यांचे जमिनी देऊन पुनर्वसन झाले. न्यायालयाने जमिनी देण्याचा आदेश देऊनही शासनाने जमिनी दिल्या नाहीत,

Back to top button