पुणे : नीलेश राणे यांची बदनामी, अपमानास्पद शिवीगाळ | पुढारी

पुणे : नीलेश राणे यांची बदनामी, अपमानास्पद शिवीगाळ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : माजी खासदार नीलेश राणे यांना टि्वटरवर अपमानास्पद शिवीगाळ करून त्यांची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. योगेश अरुण शिंगटे (वय 38, रा. डेक्कन) यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार राहुल मगर नावाच्या टि्वटर अकाऊंट चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 11 फेब्रुवारी ते 6 मार्च 2023 दरम्यान घडला आहे.

राहुल मगर नावाच्या टि्वटर अकाऊंटवरून माजी खासदार नीलेश नारायण राणे यांच्या टि्वटर अकाऊंटवर अश्लील भाषा वापरत शिवीगाळ व बदनामीकारक टि्वट केले. तसेच ठाणे येथील एका महिलेच्या टि्वटर अकाऊंटवर अश्लील भाषा वापरून टि्वट करून दोघांनी अपमानास्पद शिवीगाळ करून त्यांची बदनामी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button