पुणे : कर्मचार्‍यांना वाढदिवशी पत्राद्वारे शुभेच्छा; पीएमपी अध्यक्ष बकोरिया यांचा उपक्रम | पुढारी

पुणे : कर्मचार्‍यांना वाढदिवशी पत्राद्वारे शुभेच्छा; पीएमपी अध्यक्ष बकोरिया यांचा उपक्रम

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कर्मचार्‍यांना संस्थेविषयी आपुलकी वाटून त्यांच्याकडून अधिकाधिक चांगले काम व्हावे, याकरिता पीएमपीचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया प्रत्येक कर्मचार्‍याला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पत्र देऊन शुभेच्छा देणार आहेत. यात महत्वाचे म्हणजे या पत्रावर बकोरिया स्व:हस्ताक्षरात स्वाक्षरी करणार आहेत. त्यामुळे हे पत्र पीएमपी कर्मचार्‍यांसाठी संग्रह असणार आहे. पीएमपीचे अध्यक्ष ओमरप्रकाश बकोरिया यांनी पदभार स्विकारल्यापासून अनेक प्रवासी आणि कर्मचार्‍यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत.

त्यामुळे पीएमपीच्या वर्तुळात उत्साहाचे वातावरण असून, परिणामी, अलीकडच्या काही महिन्यात उत्पन्नात सुध्दा वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळेच बकोरिया हे कर्मचार्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी दरमहिन्याच्या तिसर्‍या सोमवारी कर्मचार्‍यांना भेटतात, त्
यांच्या समस्या ऑन द स्पॉट सोडवितात. यामुळे अध्यक्षांबाबत कर्मचार्‍यांमध्ये आदराची भावना निर्माण झाली असून, त्याची उत्पन्न वाढीसाठी मोठी मदत होत आहे. याचाच एक भाग म्हणून बकोरिया यांनी स्व:हस्ताक्षरात स्वाक्षरी केलेले जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारे पत्र आता थेट कर्मचार्‍यांना जात आहे.

अनेकांना गेले पत्र…
पीएमपीच्या ताफ्यात 10 हजार कर्मचारी आहेत. यात सफाई कामगार, क्लार्क, चालक, वाहक, देखभाल-दुरुस्ती करणारे, सुरक्षा रक्षक, हंगामी बदली चालक, वाहक व अधिकारी आहेत. या उपक्रमाला नुकतीच सुरुवात झाली असून, आतापर्यंत अनेक कर्मचार्‍यांना बकोरियांनी शुभेच्छा दिलेले पत्रसुध्दा पोहोचायला सुरुवात झाली आहे.

Back to top button