अजित पवार यांचे पुत्र जय पवार-मनोज जरांगे यांची भेट; चर्चांना उधाण | पुढारी

अजित पवार यांचे पुत्र जय पवार-मनोज जरांगे यांची भेट; चर्चांना उधाण

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांची आज (दि.५) दुपारी भेट घेतली. जय पवार आणि जरांगे- पाटील यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

जय पवार हे हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगरला आले होते. तेथून ते थेट कारने अंतरवाली सराटीत दाखल झाले. मात्र, जय पवार यांना मनोज जरांगे- पाटील यांची तब्बल अर्धा तास वाट पाहावी लागली. ते अंतरवाली सराटीत आले, त्यावेळी जरांगे -पाटील बाहेर दौऱ्यावर गेले होते. ते आल्यानंतर जय पवार यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी दोघांनीही एकमेकांचं स्वागत केलं. मात्र, त्यांच्यात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे दोघांकडून सांगण्यात आले. ही भेट राजकीय नसून सदिच्छा भेट असल्याचा निर्वाळाही जय पवार यांनी यावेळी  पत्रकारांशी बोलताना केला, मात्र या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

बारामतीत चुरशीची लढत

बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे तर अजित पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या लढतीकडे महाराष्ट्राच्या लक्ष लागून राहिले आहे. यातच आज जय पवार यांनी जरांगे-पाटलाची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना मोठे उधाण आले आहे.

हेही वाचा :

Back to top button