भाजपला विरोध करण्यासाठी अजमल कसाबची बाजू घेता?; बावनकुळेंचा वडेट्टीवारांवर निशाणा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पाकिस्तानची धार्जिणी भूमिका घेतली. भाजपाला विरोध करण्यासाठी २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, वडेट्टीवार यांचा व्हिडिओ एक्सवर प्रसिद्ध करत उपस्थित केला आहे. या विरोधात भाजप, भाजयुमो आक्रमक झाली असून आज (दि.५) रोजी सायंकाळी त्यांच्याकडून आंदोलन केले जाणार आहे.

यावेळी बावनकुळे म्हणाले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तान धार्जिणी भूमिका घेतली. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती, असा शोध वडेट्टीवार यांनी लावला. निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपाला विरोध करण्यासाठी तुम्ही २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा. या शब्दात त्यांनी रोष व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, जेव्हापासून मोदीजी सत्तेत आले आहेत, तेव्हापासून दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं पण आज काँग्रेस दहशतवाद्यांसाठी अश्रू गाळत आहेत. महाराष्ट्रात मविआ सत्तेत असताना याकुबच्या कबरीवर सुशोभीकरण केलं, आता कसाबचा पुळका आला आहे. काँग्रेस आणि वडेट्टीवार यांच्या पाकधार्जिण्या भूमिकेबद्दल, जनताच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news