पुणे : कैद्यांच्या तणावमुक्तीसाठी पुन्हा फोन सेवा सुरू | पुढारी

पुणे : कैद्यांच्या तणावमुक्तीसाठी पुन्हा फोन सेवा सुरू

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कारागृहातील बंदीचा मानसिक ताणतणाव दूर होण्यासाठी कोविड काळात बंद केलेली फोन सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला जात आहे. नातेवाईक अथवा वकील प्रत्यक्ष भेटीसाठी येत नाहीत. यातूनच कैद्यामध्ये नैराश्य वाढू लागले होते. यावर उपाय म्हणून 2014 पासून बंदीसाठी दूरध्वनी सुविधेची सोय करून देण्यात आली होती.

मात्र, कोविड कारणामुळे बंद केलेली सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध गुन्ह्यांत शिक्षापात्र ठरलेल्या कैद्यांना नातेवाईक व वकिलांशी बोलता यावे, यासाठी दूरध्वनी सुविधा सुरू झाली होती. ही सुविधा वापरण्यासाठी नातेवाइकांचे दूरध्वनी नंबर कारागृह प्रशासनाकडे द्यावे लागत होते. तपासणीनंतरच कैद्यांना भेटता येत होते. नैराश्य टाळण्यासाठी शासनाने दिलेल्या सुविधेचा फायदा घेतला जात नव्हता. यावर उपाय म्हणून पुन्हा हा कायदा लागू करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Back to top button