पिंपरी : निवडणूक अधिकारी, कर्मचार्‍यांना ‘बायोमेट्रिक थम्ब’मधून सूट | पुढारी

पिंपरी : निवडणूक अधिकारी, कर्मचार्‍यांना ‘बायोमेट्रिक थम्ब’मधून सूट

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त केलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना बायोमेट्रिक थम्बमधून सवलत देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी काढला आहे.

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारीला निधन झाले. रिक्त झालेल्या चिंचवड विधानसभा मतदार संघात पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. त्यासाठी 26 फेब्रुवारीला मतदान होणार असून 2 मार्चला मतमोजणी आहे. निवडणूक कामकाजासाठी महापालिकेतील 245 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी रुजू झालेल्या त्या अधिकारी व कर्मचार्‍यांना बायोमेट्रिक थम्ब, फेस रिडिंग इम्प्रेशन प्रणालीमधून सवलत देण्यात आली आहे. निवडणूक कामकाजातून अधिकारी व कर्मचार्‍यांना कार्यमुक्त केल्यानंतर त्यांना बायोमेट्रिक थम्ब, फेस रिडिंग इम्प्रेशन प्रणाली बंधनकारक असणार आहे, असे उपायुक्त जोशी यांनी आदेशात नमूद केले आहे.

Back to top button