बुट्टेवाडीतील स्पर्धेत तब्बल 810 बैलगाड्यांचा सहभाग | पुढारी

बुट्टेवाडीतील स्पर्धेत तब्बल 810 बैलगाड्यांचा सहभाग

राजगुरुनगर (ता. खेड); पुढारी वृत्तसेवा : बुट्टेवाडी येथे रोकडोबा महाराजांच्या यात्रेनिमित्ताने आयोजित 4 दिवसीय बैलगाडा शर्यतीमध्ये 810 बैलगाड्यांनी सहभाग घेतला. बुट्टेवाडी (ता. खेड) येथे रोकडोबा महाराजांचा उत्सव भक्तिभावाने साजरा झाला. उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीही पार पडल्या. शर्यतीचे उद्घाटन व घाटाचे पूजन सातकरस्थळ ग्रामपंचातीचे माजी सरपंच अजय चव्हाण यांच्या हस्ते झाले.

चार दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये पहिल्या दिवसाचा प्रथम क्रमांक गणेश वाळुंज यांच्या बैलगाड्याने पटकवला. दुसर्‍या दिवसाचा प्रथम क्रमांक सुनील पठारे, तिसर्‍या दिवसाचा प्रथम क्रमांक महेश लांडगे, चौथ्या दिवशीचा प्रथम क्रमांक बबन पडवळ यांच्या बैलगाड्याने मिळवला.

बैलगाडा घाट सुरू असताना माजी जि. प. सदस्य अतुल देशमुख, बाबाजी काळे, संदीप घनवट, राहुल गोरे, मयूर मोहिते, मृण्मय काळे आदींनी भेटी दिल्या. यात्रेचे नियोजन अ‍ॅड. संतोष तळेकर, अ‍ॅड. प्रकाश तळेकर, बाळशिराम पोळ, यात्रा कमिटीचे अध्यक्ष सतीश तळेकर, सरपंच दत्तात्रय ठाकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button