कान्हे : पीएमपीएमएलची बससेवा पूर्ववत | पुढारी

कान्हे : पीएमपीएमएलची बससेवा पूर्ववत

कान्हे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीएल बस ग्रामीण भागात बंद झाल्यामुळे विद्यार्थी व नागरिकांचे हाल झाले. यासंदर्भात दैनिक ‘पुढारी’ने बातमी प्रसिद्ध केली होती. बातमी प्रसिद्ध होताच पीएमपीएमएल बससेवा पुन्हा सुरू झाल्या. शासनाने केवळ आक्षेप घेऊन त्वरित पीएमपीएमएलला ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत करण्याचे आदेश दिले.

त्या आदेशाला धरून लगेचच निगडी ते लोणावळा, वडगाव ते कात्रज, निगडी ते टाकवे बुद्रुक व निगडी ते उर्से या बससेवा सुरू करण्यात आल्या. यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थी, कामगारवर्ग यांना जो त्रास होत होता. त्या त्रासापासून सुटका झाल्याने त्यांना हायसे वाटले आहे.

Back to top button