राज्यात थंडीचा कडाका हळूहळू वाढतोय | पुढारी

राज्यात थंडीचा कडाका हळूहळू वाढतोय

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात थंडी वाढत आहे. मात्र, थंडीचा हा कडाका हळूहळू वाढत असल्याचे दिसून आले आहे. राज्यात सोमवारी (दि. 7) नाशिक शहराचे किमान तापमान 12. 6 अंश सेल्सिअस नोंदले गेले. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत कोकणच्या काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला, तर पुढील पाच दिवस राज्यात हवामान कोरडे राहील, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

राज्यात नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून अधूनमधून ढगाळ वातावरण, तर अधूनमधून किमान तापमानात घट होत आहे. सलग थंडी अजूनही पडलेली नाही. मात्र, हळूहळू रोज किमान तापमानात घट होत असल्याचे दिसून आले आहे. दक्षिण भारतात ईशान्य मान्सून अ‍ॅक्टिव झाल्यामुळे बंगालच्या उपसागरापासून ते अगदी आंध्र प्रदेशाची किनारपट्टी, दक्षिण तमिळनाडू या भागापर्यंत जोरदार वारे, तसेच कमी दाबाचा पट्टा यामुळे दक्षिणेकडून राज्याकडे बाष्पयुक्त वारे येत आहे.

त्यामुळेच राज्यात अजूनही पाहिजे तशी थंडी पडत नाही. याचबरोबर पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे उत्तरेकडून राज्याकडे थंड वारे वाहत नाहीत. कोरडे हवामान यामुळेदेखील राज्यातील थंडी कमी होत आहे.

Back to top button