जुन्नर : रोहकडी येथे भरवस्तीत बिबट्याचे पिल्लासह दर्शन | पुढारी

जुन्नर : रोहकडी येथे भरवस्तीत बिबट्याचे पिल्लासह दर्शन

ओतूर, पुढारी वृत्तसेवा : रोहकडी येथे आज (दि.25) दुपारी  बिबट्या मादीचे दोन पिल्लांसह दर्शन झाले. तेथून मार्गस्थ होणाऱ्या प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये बिबट्या मादीला कैद केले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घटनास्थळी लोकांना गर्दी केली होती. वर्दळ आणि मानवी वस्ती असलेल्या स्त्यावर वन्यप्राणी येऊ लागल्याने लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

 स्थानिकांकडून मिळालेली माहितीनुसार, रोहकडी परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या असून शेतकऱ्यांना शेतात काम करणे अवघड झाले असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपूर्वी पिंपरी पेंढार येथे महिलेवर आणि तिच्या बाळावर बिबट्याने हल्ला केला होता. या घटनेत आईसह 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना ताज्याच असल्याने जुन्नर तालुक्यात भितीचे वातावरणात नागरिक वावरत आहेत.

जुन्नर तालुक्यात प्रत्येक गावात बिबट्यांचे दिवसा आणि रात्री दर्शन घडू लागले आहे. संपूर्ण तालुका बिबट्यांचे साम्राज्य निदर्शनास येत असून बिबट्या मुक्त तालुका कधी होणार? असा सवाल देखील नागरिक करू लागले आहेत. वन विभागाने याबाबत तात्काळ पावले उचलून मानवाला भयमुक्त करावे, अशी मागणी हाेत आहे.

हेही वाचा : 

Back to top button