धुक्यात हरवले तळेगाव | पुढारी

धुक्यात हरवले तळेगाव

तळेगाव स्टेशन; पुढारी वृत्तसेवा: निसर्गाचे वरदान असलेल्या तळेगाव दाभाडे परिसरात सध्या निसर्गाचे सतत बदलते वातावरण आहे कधी उन, कधी ढगाळ, कधी पाऊस असे वातावरण असताना आज ११ ऑक्टोबरला सकाळच्या सुमारास दाट धुक्याची चादर पसरली होती. यामुळे वाहनचालकांना लाईट लावून वाहने चालवावी लागत होती.

धुक्यामुळे महामार्गावर वाहतूकीचा वेग काहीसा मंदावला होता. अधुन मधुन वाहतूक कोंडीही होत होती. तसेच दूध वितरक, वर्तमान पत्र वितरण करणारे, कामगार यांना त्रासदायक ठरत होते. मॉर्निंग वॉक करणा-यांना जवळचे काहीच दिसत नव्हते. डोंगर, इमारती धुक्यात बुडाल्या होत्या. भात, ऊस, आदी पीके काढणीस आली असल्यामुळे धुक्याचा परीणाम या पीकांच्या उत्पादनावर होणार नाही असे दिसून येते.

Back to top button