पुणे : विविध तांत्रिक कामामुळे रेल्वेच्या काही गाड्या रद्द | पुढारी

पुणे : विविध तांत्रिक कामामुळे रेल्वेच्या काही गाड्या रद्द

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील काचेवानी स्थानकावर ब्लॉक घेऊन विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुण्यातून धावणार्‍या रेल्वेच्या काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. यात पुणे-हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस 30 ऑगस्टपासून 4 सप्टेंबरपर्यंत रद्द राहणार आहे, तर 1 सप्टेंबर रोजी सुटणारी बिलासपूर-पुणे एक्स्प्रेस रद्द राहणार आहे. पुणे-हटिया एक्स्प्रेस, संत्रागाछी-पुणे एक्स्प्रेसदेखील रद्द राहणार आहे. याशिवाय, कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेसचा प्रवास नागपूर स्थानकावर संपेल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

वाल्हे-निरा रेल्वे गेट आज बंद
पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील वाल्हे-नीरा रेल्वे स्टेशनदरम्यान असलेले रेल्वेचे फाटक क्रमांक 27 आवश्यक तांत्रिक कामांमुळे मंगळवारी (दि. 30) सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहील. या कालावधीत निरा-मोरगाव-जेजुरी हा मार्ग रस्ता वाहतुकीसाठी पर्याय म्हणून उपलब्ध असेल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Back to top button