धायरी परिसरात रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू | पुढारी

धायरी परिसरात रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू

धायरी; पुढारी वृत्तसेवा: नर्‍हे, धायरी परिसरातील रस्त्यांची खड्डयांमुळे चाळण झालेली होती. त्याबाबतचे वृत्त ‘पुढारी’त प्रसिद्ध होताच प्रशासनाने याची त्वरित दखल घेत येथील रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम सुरू केले. भूमकर चौक, झील कॉलेज, श्री कंट्रोल चौक, पारी कंपनी, तसेच रायकर मळा, जाधवनगर, अंबाई दरा भागातील खड्ड्यांमुळे रस्त्यांची मोठी दयनीय अवस्था झाली आहे.

त्यामुळे दुचाकीचालकाचे अपघात होण्यांसह वाहने खड्ड्यात आदळून मणक्याचे विकार वाढले आहेत. त्यामुळे येथील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे त्वरित करण्यात यावी, अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करणार, असा इशाराही स्थानिकांनी दिला होता.

येथील रस्त्यावर पडलेले खड्डे महापालिकेच्या वतीने बुजविण्यात येऊन डांबरीकरण करण्यात येत असल्यामुळे आमचा त्रास लवकरच सुटणार आहे. त्याबद्दल पुणे महानगरपालिका प्रशासन रस्ते विभागासह दैनिक पुढारीचेही मन:पूर्वक धन्यवाद!
-माधुरी याळगी,
स्थानिक नागरिक

 

Back to top button