पिंपरी : भोसरी येथे मोबाईल चोरीची घटना | पुढारी

पिंपरी : भोसरी येथे मोबाईल चोरीची घटना

पिंपरी : रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेचा आणि एका तरुणाचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावला. ही घटना मंगळवारी (दि.16) दुपारी दोनच्या सुमारास अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ भोसरी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला आपल्या मैत्रिणीसोबत कामावर जात होत्या.

त्या फोनवर बोलत असताना पाठीमागून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांचा मोबाईल पळविला. पुढे जाऊन चोरट्यांनी रस्त्याने जाणार्‍या साईनाथ शांतप्पा यांचा देखील मोबाईल हिसकावला आहे. या विरोधात महिलेने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींवर कलम 392, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button