खडकवासला : कचरा वाहतुकीसाठी धोकादायक ट्रॅक्टर ट्रॉली | पुढारी

खडकवासला : कचरा वाहतुकीसाठी धोकादायक ट्रॅक्टर ट्रॉली

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: धायरी परिसरातील दाट लोकवस्तीच्या गल्लीबोळात कचर्‍यांची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर-ट्रॉलीमुळे नागरिकांवर अपघाताची टांगती तलवार आहे. परिसरातील अरुंद रस्ते, गल्ल्यांमध्ये कचरा गोळा करण्यासाठी टेम्पो व इतर मध्यम आकाराची वाहन आहेत. मात्र, धायरी येथील बेनकर मळा व इतर परिसरात मात्र धोकादायक ट्रॉलीतून कचर्‍याची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे लहान मुले, नागरिकांच्या जिवाला धोका आहे.

याकडे माजी उपसरपंच धनंजय बेनकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर काही दिवस ट्रॉली बंद करण्यात आल्या. आता पुन्हा ट्रॉली सुरू आहेत, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. याबाबत सिंहगड रोड आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता, अरुंद रस्ते, लोकवस्त्यातील धोकादायक कचरा वाहतुकीची माहिती घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

 

Back to top button