पुणे : निरावागज येथेअंगावर वीज पडल्याने एकजण गंभीर | पुढारी

पुणे : निरावागज येथेअंगावर वीज पडल्याने एकजण गंभीर

बारामती, पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील निरावागज येथे बुधवारी (दि. २७) रात्री अकराच्या सुमारास अंगावर वीज पडल्याने साहेबराव नारायण पवार (वय ६०, मूळ रा. उरुळीकांचन, ता. हवेली) हे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना पुण्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागपूर हादरले! ११ वर्षीय मुलीवर ९ जणांचा सामूहिक बलात्कार, पैशांचे आमिष दाखवून केलं कृत्य

माळेगाव पोलिस ठाण्याकडून यासंबंधी माहिती देण्यात आली. पवार हे उदरनिर्वाहासाठी आठवडाभरापूर्वीच निरावागज परिसरात आले होते. गावालगत पाल ठोकून ते कुटुंबासह राहत होते. बुधवारी रात्री वीजांच्या कडकडाटासह तालुक्यात पाऊस झाला. त्यात वीज अंगावर पडल्याने पवार हे जखमी झाले.

आता १७ वर्षे पार केल्यानंतर युवक करु शकतात मतदान ओळखपत्रासाठी अर्ज

त्यांना रुग्णवाहिकेतून सुरुवातीला बारामतीतील शासकीय महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुण्याला ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

West Bengal SSC scam : ती ‘ब्‍लॅक’ डायरी आणि अभिनेत्री अर्पिता मुखर्जी; काय आहे शिक्षक भरती घोटाळ्याशी कनेक्‍शन?

Back to top button