निमगाव दुडे-कवठे येमाई रस्ताकडेच्या झुडपांची सफाई | पुढारी

निमगाव दुडे-कवठे येमाई रस्ताकडेच्या झुडपांची सफाई

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा: शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे – कवठे येमाई या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली होती. याबाबत दैनिक पुढारीने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ही झाडेझुडपे काढून घेतली आहेत.
वाढलेल्या झाडे, झुडपामुळे रस्ता झाकला गेल्याने येणारी-जाणारी वाहने दिसत नव्हती. टाकळी हाजी येथून कवठे येमाई, सविंदणे तसेच भीमाशंकर कारखाना या भागाला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे, त्यामुळे या रस्त्यावर मोठी रहदारी असते.

सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याबाबत निमगाव दुडेचे नवनिर्वाचित उपसरपंच संदीप वागदरे यांनी आवाज उठविला होता. दैनिक पुढारीनेही बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी लक्ष घालून शनिवारपासून रस्त्याची सफाई करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी याबाबत दैनिक पुढारीचे आभार मानले. दैनिक पुढारीने बातमी दिल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन खडबडून जागे झाले. तातडीने रस्त्याच्या कडेच्या झुडपांचा प्रश्न मार्गी लागला, असे निमगाव दुडेच्या सरपंच अश्विनी राम गायकवाड यांनी नमूद केले.

Back to top button