माजी नगराध्यक्षांच्या सुनेची आत्महत्या | पुढारी

माजी नगराध्यक्षांच्या सुनेची आत्महत्या

आळंदी : पुढारी वृत्तसेवा: आळंदी नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता अशोक उमरगेकर – कांबळे यांच्या सुनेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली. प्रियंका अभिषेक उमरगेकर (वय 23) असे तिचे नाव आहे. प्रियंका या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी येथील माजी नगरसेविका कमल अनिल घोलप यांच्या कन्या होत.

प्रियंका यांचा आठ महिन्यांपूर्वीच अभिषेक यांच्याशी विवाह झाला होता. प्रियंका यांना वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तपास आळंदी पोलिस करीत आहेत.

हेही वाचा

सोलापूर : पन्नासवरुन टोमॅटो 20 रुपये किलोवर

शिवसेना ठाकरे कुटुंबीयांच्याच पाठीशी : अभंगराव

अघवे शहर विठ्ठलमय; आषाढी एकादशीनिमित्त मंदिरांत भक्तीचा महापूर

Back to top button