सोलापूर : पन्नासवरुन टोमॅटो 20 रुपये किलोवर

भाजीपाला
भाजीपाला

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  जून महिन्यात लागवड केलेल्या पालेभाज्याची आवक बाजारात मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे पालेभाज्याचे दर कोसळले आहेत, जून महिन्यात 50 रुपयास एक किलो असलेला टोमॅटो 20 रुपये किलोला मिळत आहे. पालेभाज्या आणि फळभाज्याचेही दर कोसळले आहे.

जून महिन्यात पालेभाज्याची आवक कमी येत होती. त्यामुळे पालेभाज्याचे दर तेजीत होते. परंतु, जुलै महिन्यात पालेभाज्याची आवक अधिक येत असल्याने दर कमी झाले आहेत. याबरोबर स्थानिक शेतकर्‍यांजवळील पालेभाज्या बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहेत. पुढे श्रावण सुरू झाल्यानंतर पालेभाज्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या पालेभाज्याचे दर पालक (प्रति शंभर पेंडीस) 200 ते 500, राजगीरा 400 ते 600, मेथी 800 ते 1300, कांदा पात 700 ते 1000, कोंथिबीर 500 ते 1300, वांगी (प्रति दहा किलोस) 80 ते 250, कारली 150 ते 350, कोबी 60 ते 110, ढोबळी मिरची 150 ते 250, गाजर 280 ते 350, गवारी 250 ते 400, काकडी 40 ते 300, फ्लॉवर 40 ते 160, घेवडा 150 ते 200, चाकवत 40 ते 60, हिरवी मिरची 160 ते 350, भेंडी 100 ते 300, लिंबू 150 ते 350, दोडका 120 ते 330, टोमॅटो 30 ते 200 यानंतर फळाचे दर डाळिंब 100 ते 1350, पपई 40, मोसंबी 150 ते 500, खरबुज 80 ते 100, पेरू 100 ते 400, आंबा 250 ते 500, सिताफळ 100 ते 500, सफरचंद 1200 ते 2500, तांदुळ (प्रति क्‍विटंल) 2870 ते 6060, कांदा 100 ते 2200 क्‍विंटल असा दर आहे. हा दर लिलावमधील असून किरकोळ बाजारात अधिक दर असणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news