छ.संभाजीनगर : सोलनापूर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

छ.संभाजीनगर : सोलनापूर येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यात विजेचा धक्का लागून मृत्यू होण्याच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. तालुक्यातील सोलनापुर येथे सोमवारी (दि.१७) शेतात काम करणाऱ्या तरूणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. शाहरुख शफिक शेख (वय २५ रा.सोलनापुर ता.पैठण) असे या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सोलनापुर येथील शाहरूख शेख हा सोमवारी शेतात काम करण्यासाठी गेला होता. यादरम्यान शेतात विद्युत पुरवठा करणाऱ्या डीपीची पाहणी करत असताना करत डीपीला स्पर्श झाल्याने त्याचा विजेचा जोरदार धक्का बसला. नातेवाईकांनी त्याला तातडीने पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी पैठण पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news