विधानसभेच्या तयारीला लागा; बावनकुळेंचे भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन

विधानसभेच्या तयारीला लागा; बावनकुळेंचे भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: गेल्या निवडणुकीत झालेल्या चुकांना विसरून नव्याने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा. भाजपा महायुती उमेदवाराला विजयी करण्यासाठी बूथ पातळीवरून कामाला सुरुवात करा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना केले. तसेच येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार कुणीही असला तरी तो महायुतीचा घटक आहे. त्यामुळे त्याला विजयी करण्याची जबाबदारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उचलावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

रामटेक, उमरेड व हिंगणा भागातील पदाधिकाऱ्यांशी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (दि.१७) संवाद साधत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते.

बावनकुळे यांनी सोमवारी सकाळी रामटेक येथे विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर दुपारी उमरेड येथील पंडित दीनदयाल उपाध्याय सभागृहात उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. सायंकाळी वानाडोंगरी येथील वायसीसीई कॉलेज परिसरात हिंगणा व नागपूर ग्रामीण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी भाजपा नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, आ. समीर मेघे, माजी आमदार सुधीर पारवे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रभारी डॉ. आशिष देशमुख, डॉ. राजीव पोतदार, मल्लिकार्जुन रेड्डी, अरविंद गजभिये, अनिल निधान, रिंकेश चवरे, आदर्श पटले, अविनाश खडतकर, उदयसिंग यादव, संजय मुलमुले, सुधाकर मेंगर, दिलीप देशमुख, राहुल किरपान, योगेश वाडीभस्मे, अतुल हजारे, आशिष फुटाणे, इतर मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news