पिंपरी : महापालिका दवाखान्यांमध्ये ओरआरएस मोफत उपलब्ध | पुढारी

पिंपरी : महापालिका दवाखान्यांमध्ये ओरआरएस मोफत उपलब्ध

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या वतीने सध्या विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. अतिसार रुग्णांचे उपचार व दक्षता याबाबत त्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. अतिसारामुळे होणारे मृत्यू हे टाळता येणारे आहे. क्षारसंजीवनी (ओआरएस) झिंकच्या वापरामुळे हे शक्य होते. सर्व महापालिका रुग्णालय व दवाखान्यात ओआरएस मोफत उपलब्ध करुन दिले आहे.

योग्य व वेळेत उपचार केल्यास अतिसार निश्चितच आटोक्यात येऊ शकतो. अतिसार झालेल्या रुग्णांवरील उपचार आणि आवश्यक दक्षता याबाबत जनजागृती व्हावी यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विशेष अतिसार नियंत्रण पंधरवड्याचे आयोजन केले आहे. शहरात 15 तारखेपर्यंत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविला जात आहे.

सातारा भागात ‘रेड अलर्ट’

या पंधरवड्याला 1 तारखेपासून सुरुवात झाली आहे. नागरिकांमध्ये अतिसार व्यवस्थापनासाठी जागरुकता निर्माण करणे, दवाखाना रुग्णालयात ओ.आर.एस. झिंक कॉर्नरची स्थापना करणे, शहरातील झोपडपट्टी परिसर, स्थलांतरीत नागरिक राहत असलेल्या वस्त्या, बांधकाम मजूर आदींपैकी पाच वर्षाखालील मुले असलेल्या कुटुंबांना ‘आशा’ स्वयंसेविकांमार्फत पाच वर्षांखालील मुले असलेल्या कुटुंबांना ओ.आर.एस. झिंकचे वाटप करण्यात येत आहे, असे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी कळविले आहे.

काय घ्यायला हवी काळजी
पालकांनी वैयक्तिक तसेच परिसर स्वच्छता ठेवावी. बाळाला भरविण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ ध्रुवावे. स्वच्छ निर्जंतुक केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. ताजे व स्वच्छता ठेवून बनविलेले अन्न बालकास द्यावे.

Back to top button