सातारा भागात ‘रेड अलर्ट’ | पुढारी

सातारा भागात ‘रेड अलर्ट’

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : गुजरात ते महाराष्ट्राची किनारपट्टी आणि पूर्व राजस्थानपासून मध्य प्रदेशपर्यंतच्या भागात दोन कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. त्यामुळे कोकणसह कोल्हापूर व सातारा या भागात अतिमुसळधार (रेड अलर्ट) पाऊस बरसणार असून मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात 6 ते 8 जुलै हे तीन दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोकणात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अतिमुसळधार पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. या पुरामुळे कोकणच्या बहुतांश भागात गावागावांत पुराचे पाणी शिरले आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातही अतिवृष्टी झाली आहे, तर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात त्यातुलनेत सध्या पाऊस कमी प्रमाणात बरसत आहे.

रेड अलर्ट : पालघर (8 जुलै), रायगड (6 ते 8 जुलै), रत्नागिरी (6 ते 8 जुलै), कोल्हापूर (6 ते 8 जुलै), सातारा (6 ते 8 जुलै).

ऑरेंज अलर्ट : पालघर (6 ते 9 जुलै), ठाणे (6 ते 9 जुलै), मुंबई (6 ते 9 जुलै), रायगड (9 जुलै), सिंधुदुर्ग (6 ते 9 जुलै), नाशिक (6 ते 9 जुलै), पुणे (6 ते 9 जुलै), कोल्हापूर (9 जुलै), सातारा (9 जुलै).

यलो अलर्ट : धुळे (8 जुलै), नंदुरबार (6 ते 9 जुलै), जळगाव (8 जुलै), नगर (8 जुलै), औरंगाबाद (6 व 7 जुलै), जालना (6 व 7 जुलै), परभणी (6 व 7 जुलै), हिंगोली (6 व 7 जुलै), नांदेड (6 व 7 जुलै).

Back to top button