पुणे : शिवगंगा खोरे मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत | पुढारी

पुणे : शिवगंगा खोरे मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत

खेड शिवापूर : पुढारी वृत्तसेवा : हवामान खात्याने सांगितलेल्या निकषानुसार किंबहुना तुरळक पावसाच्या भरवशावर शिवगंगा खोर्‍यातील अनेक शेतकर्‍यांनी रोपांसाठी भाताचे बियाणे खाचरात टाकले असून जवळपास वीस ते तीस टक्के शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. मात्र पावसाचा जोर पाहाता पेरलेले बी उगवत नसल्याने शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र निर्माण झाले असून पेरणी न केलेले शेतकरी आभाळाकडे पाहत आहेत, तर दुसरीकडे उगवलेली भाताची रोपे पिवळी पडू लागली आहेत.

कोरोना घालतोय घिरट्या; खेळाडू झोडताहेत पार्ट्या

शिवगंगा खोर्‍यात अनेक ठिकाणी पावसाने पाठ फिरवली आहे. शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पेरणी केलेल्या पिकांची दुबार पेरणी करावी लागणार नाही ना, असा प्रश्न शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाला आहे. तर भात रोपांची लागवड केलेल्या शेतकर्‍यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. येत्या तीन-चार दिवसात मोठा पाऊस पडला नाही तर शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसू शकतो हे नाकारता येत नाही.

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे बहुमत चाचणी नाही, विधानसभेचे विशेष अधिवेशन स्थगित

वीस ते पंचवीस टक्के शेतकर्‍यांनी पावसाच्या भरवशावर खरीप हंगामातील पेरणी केलेली पिके सध्या तरी धोक्यातच आहेत. कारण पेरण्या होऊन जवळपास पंधरा दिवस झाले आहेत, त्यामुळे ही पिके जळून जाऊन दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. दुसरीकडे भात पिकांची लागण आतापर्यंत झाली पाहिजे होती. मात्र पावसाअभावी ती झाली नाही याचा फटका उत्पादनात घट होणार हे निश्चितच. यामुळे भाताचे पीक एक महिना उशिरा बाजारात येणार असल्याचे खोपी (ता. भोर) येथील नवविकास युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब पवार यांनी सांगितले.

Back to top button