जयसिंगपुरात खा. धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ अभिनेता गोविंदा यांची रॅली

जयसिंगपुरात खा. धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ अभिनेता गोविंदा यांची रॅली

जयसिंगपूर : हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा. धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सायंकाळी सिनेअभिनेते माजी खा. गोविंदा, शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी जयसिंगपूर शहरातून रॅली काढली. यावेळी रॅलीत उमेदवार खा. धैर्यशील माने, माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर सहभागी झाले होेते. रॅलीला शहरवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तुमच्या आमाच्या कामाचा आणि हक्काचा खासदार म्हणून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी गोविंदा यांनी केले.

प्रारंभी अभिनेते गोविंदा यांनी आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. आ. यड्रावकर यांनी अभिनेते गोविंदा यांचा सत्कार केला. तर सौ. त्रिशला संजय पाटील-यड्रावकर यांनी शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांचा सत्कार केला. त्यानंतर रॅलीस सुरुवात झाली. स्टेशन रोडने रॅली चौथ्या गल्लीत आली. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात अभिनेते गोविंदा यांनी दर्शन घेतले. यानंतर रॅली पहिल्या गल्लीतून स्टेशन रोडने गांधी चौक मार्गे मध्यवर्ती क्रांती चौकात आली. याठिकाणी अभिनेते गोविंदा यांनी श्रीमंत जयसिंग महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर रॅली तेरावी गल्ली, जुनी भाजी मंडई, नगरपालिका रोडने राजीव गांधीनगरमध्ये आली. यानंतर रॅलीची सांगता झाली.

रॅलीत शरद साखर कारखान्याचे संचालक आदित्य पाटील-यड्रावकर, राहुल पाटील, माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे, दादासो पाटील (चिंचवाडकर), प्रकाश लठ्ठे, माजी नगरसेवक राहुल बंडगर, महेश कलकुटगी, अभिजित भांदिगरे, प्रवीण इंगळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news