लंडन ः भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅम येथे 1 जुलैपासून एकमेव कसोटी सामना खेळला जाणार असून त्यापूर्वीच कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली. तो अजूनही विलगीकरणात आहे. असे असले तरी भारतीय संघातील खेळाडू मेजवान्या झोडण्यात व्यस्त आहेत. सोशल मीडियावर त्याचे काही फोटो व्हायरल होऊ लागले आहेत.
इंग्लंडमध्ये बाहेर फिरताना रोहित-विराटला भारतीय क्रिकेट मंडळाने नुकतीच कडक ताकीद दिली होती. तथापि, याचा परिणाम भारतीय खेळाडूंवर झालेला नाही. बर्मिंगहॅममधील एका रेस्टॉरंटमध्ये खेळाडूंचे डिनर पार्टीचे फोटो व्हायरल होत आहेत. एवढेच नव्हे तर या खेळाडूंनी रेस्टॉरंटच्या कर्मचार्यांसोबत फोटोही काढले आहे. यामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, नवदीप सैनी आणि ऋषभ पंत यांच्यासह अनेक खेळाडू दिसत आहेत.
रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरच बीसीसीआयने सर्व खेळाडूंना प्रोटोकॉल पाळण्याच्या सूचना दिल्या होत्या. गेल्या काही दिवसांत अशी अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही खेळाडू चाहत्यांसोबत फोटो क्लिक करत होते. हे धोकादायक असू शकते. दरम्यान, इंग्लंड दौर्यात दोन्ही संघांमध्ये 1 कसोटी सामना, 3 टी-20 सामने आणि 3 एकदिवसीय सामने होणार आहेत.
हेही वाचा