ज्येष्ठही निघाले विठूरायाच्या भेटीला | पुढारी

ज्येष्ठही निघाले विठूरायाच्या भेटीला

सुवर्णा चव्हाण

पुणे : कोणी 51 वेळा, तर कोणी 40 वेळा पायी वारी केली आहे. विठ्ठलाच्या भेटीची आस आजही त्यांना खुणावते अन् त्या ज्येष्ठांची पावले पंढरीकडे पालखी सोहळ्यात चालू लागतात. कोरोनामुळे दोन वर्षे पायी वारी करता आली नाही. परंतु, यंदा मात्र ज्येष्ठ वारकरी वयाची बंधने तोडून माउलीला भेटायला निघाले आहेत. वय अधिक असले तरी काय झाले, जोश मात्र तोच आहे, असे म्हणत मनाने तरुण असलेले ज्येष्ठ वारकरी नव्या दमाच्या ऊर्जेने पालखीत सहभागी होणार आहेत. पालखी सोहळा म्हटला की वय आड येत नाही.

काही ज्येष्ठ वारकरी आहेत ज्यांनी पालखीत सहभागी होण्यात खंड पडू दिला नाही, त्यांचा हा प्रवास अविरतपणे सुरूच आहे. कोरोनामुळे पालखी सोहळ्यात खंड पडला खरा. पण, यंदा नव्या उत्साहाने, ऊर्जेने वय विसरून ज्येष्ठ वारकरी वारीत सहभागी होणार आहेत. कोणी सत्तरीत आहेत, तर कोणी वयाची 85 वर्षे पूर्ण केली आहेत. पण, प्रत्येक वर्षी पालखी सोहळा आनंद देतो. त्यामुळे पालखीत चालताना आजारपण किंवा वय आड येत नाही.

पुणे शहरात नव्या विषाणूंचे आणखी पाच रुग्ण

अर्थ क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ वारकरी नंदकुमार लांडगे हे गेल्या 51 वर्षांपासून संत ज्ञानेश्वर महाराज पालखीत शेडगे पंचमंडळी दिंडी क्रमांक 4 मध्ये सहभागी होत आहेत. यंदाची त्यांची 52 वी वारी आहे. त्यांचे वय 85 वर्षे असून, कुटुंबाचा वारसा त्यांनी पुढे जपला अन् तो प्रवास अविरतपणे सुरूच आहे. याविषयी लांडगे म्हणाले, ‘मी आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी जवळपास 51 वर्षे केली आहे आणि आजही माउलींच्या भेटीची ओढ मला वारीत घेऊन जाते. प्रत्येक वर्षी मी वारीची वाटच पाहत असतो.

कोरोनामुळे दोन वर्षे या प्रवासात व्यत्यय आला. पण, यंदा वारी असल्याने मनात एक आनंद आणि उत्साह आहे. वारीत सहभागी होण्याच्या तयारीला लागलो आहे.’ पालिकेतील माजी अधिकारी विनायक सोनावणेही 40 वर्षांपासून पालखीत सहभागी होत आहेत. त्यांचे वय 71 वर्षांचे आहे. सोनावणे म्हणाले, ‘संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत मी दिंडी क्रमांक 4 मध्ये सहभागी होतो. बघता बघता 40 वर्षांचा प्रवास झाला आहे. यंदाही पालखीत सहभागी होणार आहे. आम्ही वय विसरून या प्रवासात सहभागी होतो. हा प्रवास मला खूप आनंद आणि ऊर्जा देतो. हा सोहळा पाहण्यासारखा असतो. पालखी आपल्यात एक संस्कार रुजवते.’

हेही वाचा

सांगली : जाडरबोबलादच्या एकास मरेपर्यंत सक्‍तमजुरी

भाजप खासदार, आमदारांनी साजरा केला आनंदोत्सव

संतोष जाधवला मिळाले साडेतीन लाख; मुसेवालाच्या हत्येसाठी आठ शार्प शूटर्सना सुपारी

Back to top button